फीड द मॉन्स्टर आपल्या मुलास वाचनाची मूलभूत शिकवण देते . राक्षसांची अंडी गोळा करा आणि त्यांना अक्षरे खायला द्या जेणेकरून ते मोठे होऊन आपले मित्र बनतील!
फीड द मॉन्स्टर काय आहे?
फीड द मॉन्स्टर मुलांमध्ये व्यस्त रहाण्यासाठी आणि त्यांना वाचण्यास मदत करण्यासाठी सिद्ध केल्या गेलेल्या ‘खेळातून शिक्षण ’ तंत्रांचा वापर करते. मूलभूत गोष्टी वाचताना मुले पाळीव राक्षस गोळा करतात आणि त्यांना वाढविण्याचा आनंद घेतात.
विनामूल्य डाउनलोड , अॅड नाही, अॅप मध्ये कसलीही खरेदी नाही!
सर्व सामग्री 100% फुकट आहे जी साक्षरता नानफा संस्था क्युरीयस लर्निंग , सीईटी आणि अँप्स फॅक्टरीद्वारे तयार केली गेली आहे.
वाचन कौशल्ये वाढविण्यासाठी तयार केलेल्या गेम ची वैशिष्ट्ये:
• मजेदार आणि आकर्षक फोनिक( ध्वनी आधारीत ) कोडी
• वाचन आणि लेखनास मदत करण्यासाठी अक्षरांचे ट्रेसिंग गेम्स
• शब्दसंग्रह वाढवणारे स्मरणशक्तीचे खेळ
• आव्हानात्मक“ केवळ आवाजावर आधारित लेव्हल्स
• पालकांसाठी प्रगती चा अहवाल
• प्रत्येक वापरकर्त्याच्या प्रगतीसाठी एकाधिक-वापरकर्त्यांनी (मल्टियुसर)लॉगिन
• जमा करण्या सारखे , विकसनशील आणि मजेदार राक्षस
• सामाजिक-भावनिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेले
• अॅप मधील खरेदी नाही
• कोणत्याही जाहिराती नाहीत
• इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही
आपल्या मुलांसाठी तद्यांद्वारे विकसित.
हा खेळ साक्षरतेच्या विज्ञानातील अनेक वर्षांच्या संशोधन आणि अनुभवावर आधारित आहे. त्यात साक्षरतेसाठी मुख्य कौशल्ये समाविष्ट आहेत, ज्यात ध्वन्यात्मक जागरूकता, पत्र ओळख, ध्वन्यात्मक शब्दसंग्रह आणि दृष्टी संबंधित शब्दांचे वाचन यांचा समावेश आहे .जेणेकरुन मुले वाचनासाठी मजबूत पाया विकसित करू शकतील. राक्षसांच्या कळपाची काळजी घेण्याच्या संकल्पनेने तयार केलेली ही रचना मुलांसाठी सहानुभूती, चिकाटी आणि सामाजिक-भावनिक विकासास प्रोत्साहित करण्यासाठी बनविली गेली आहे.
आम्ही कोण आहोत?
फीड द मॉन्स्टर हा खेळ नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या द्वारे अनुदानीत EduApp4Syria-स्पर्धेचा भाग म्हणून बनविला गेला होता . मूळ अरबी अॅप हे अँप्स फॅक्टरी, सीईटी - सेंटर फॉर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी आणि आयआरसी - इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी (आंतरराष्ट्रीय बचाव समिती )यांच्यातील संयुक्त उद्यमातून विकसित केले गेले.
फीड द मॉन्स्टर चे इंग्रजीत रुपांतर क्युरीयस लर्निंग द्वारे केले गेले, जी एक ना-नफा तत्व वर चालणारी ज्यांना आवश्यक आहे अश्या प्रत्येकासाठी प्रभावी साक्षरतेच्या सामग्री उपलब्ध करून देण्यास समर्पित संस्था आहे . आम्ही संशोधक, विकसक आणि शिक्षक असा मिळून एक कार्यसंघ आहोत जे पुरावे आणि डेटाच्या आधारे मुलांना त्यांच्या मूळ भाषेत सार्वत्रिक साक्षरतेचे शिक्षण देण्यासाठी समर्पित आहेत - आणि जगभरातील 100+ प्रभावी भाषांमध्ये फीड द मॉन्स्टर अॅप आणण्याचे कार्य करीत आहोत.
Ažurirano dana
8. aug 2024.