आपल्या मुलांचे शिक्षण केव्हाही प्रारंभ करू शकता. बालवाडी, किंडरगार्टनर्स, बालकं आणि मोठी मुले एबीसी, मोजणी, बेरीज, वजाबाकी आणि बरेच काही शिकण्यास उत्सुक असतात! त्यांना प्रोत्साहित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्मार्ट, सुव्यवस्थित शैक्षणिक अॅप्स आणि गेम त्यांना रोजच्यारोज देणे.
Math Kids हा एक विनामूल्य गेम आहे जो कि लहान मुलांना संख्या आणि गणित शिकवण्यासाठी बनवण्यात आला आहे. यात लहान मुले आणि बालवाडीतील मुले यांना खेळण्यास आवडतील अशी अनेक मिनी-गेम्स आहेत आणि ते हा गेम जितका जास्त खेळातील तितके त्यांचे गणित कौशल्य वाढेल!
Math Kids अंगणवाडीतील मुले, बालवाडीतील मुले,पहिल्या वर्गातील मुले यांना संख्या ओळखण्यास आणि बेरीज आणि वजाबाकीचे कोड्यांसह प्रशिक्षण देण्यात मदत करेल. त्यांना गेम पूर्ण करताना आणि स्टिकर्स मिळवताना खूप मज्जा येईल, त्यांना वाढताना आणि शिकताना पाहून आपणास खूप आनंद होईल.
Math Kids मध्ये खूप पजल्स समाविष्ट केली आहेत जी तुमच्या मुलांना खेळातून शिकवतात, यामध्ये समाविष्ट आहे :
1. गणना - बेरजेच्या या सोप्या गेम मध्ये वस्तूंची गणना करणे जाणून घ्या.
2. तुलना करणे - मुले यामध्ये गणना आणि तुलना करण्याची कुशलता वाढवून कोणता समूह मोठा किंव्हा लहान आहे हे शिकू शकतात.
3. कोडे जोडणे - एक मजेदार मिनी गेम जेणेकरून मुले स्क्रीनवरील संख्या ड्रॅग करून गणित समस्या सोडवू शकतात.
4. बेरजेची मजा - वस्तूंची गणना करा आणि गहाळ नंबरवर टॅप करा.
5. बेरजेची चाचणी - आपल्या मुलांचे गणित आणि बेरीज कौशल्ये याची चाचणी घ्या.
6. वजाबाकीचे कोडे - गणित प्रश्नातील गहाळ चिन्हे रिकाम्या जागी भरा.
7. वजाबाकीची मजा - कोडे सोडवण्यासाठी वस्तूंची गणना करा!
8. वजाबाकीची चाचणी - आपल्या मुलाचे गणितातील वजाबाकीचे कौशल्य कितपत सुधारले आहे ते पहा.
जेव्हा मुलांना शिकताना खेळण्याची संधी भेटते तेव्हा त्यांना सांगितलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. हे त्यांना अधिक वारंवार जाणून घेण्यास मदत करते जेणेकरून ते जेव्हा बालवाडीत प्रवेश करतील तेव्हा त्यांना खूप मोठी मदत मिळेल.
Math Kids अनेक वैशिष्ट्यांसह येते जे प्रौढांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास मदत करते. अडचणी वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी गेम मोडचा वापर करा, किंवा मागील फेऱ्यांचा स्कोअर पाहण्यासाठी अहवालाची तपासणी करा.
Math Kids हे मोजणी, बेरीज आणि वजाबाकी या मूलभूत गोष्टींचा उत्कृष्ठ परिचय आहे. हे आपल्या बालकांना, बालवाडी व पहिल्या कक्षेत जाणाऱ्या मुलांना संख्या वेगवेगळे करणे आणि तार्किक कुशलतेसह प्राथमिक गणित शिकवेल ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यातील संपूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत होईल.
१०० कोटी बालकांना मदत करण्याच्या आमच्या धेय्यात आमची मदत करा !
या रोजी अपडेट केले
२५ डिसें, २०२४