तुम्ही काहीही शिकू शकता अगदी विनामूल्य.
एखाद्या दिवशी सांख्यिकी शिका.कधी क्रेब्ज चक्राचे कार्य समजावून घ्या. पुढच्या सत्रात येऊ घातलेले भूमितीचे धडे शिकण्यास सुरुवात करा. आगामी परीक्षांची तयारी करा. किंवा, तुम्हाला अगदीच काही हटके शिकावे वाटत असल्यास फायर स्टिक शेती पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा भूप्रदेश कसा बदलला ते जाणून घ्या.
तुम्ही विद्यार्थी, शिक्षक, मुक्त पद्धतीने शिक्षण घेणारे विद्यार्थी, मुख्याध्यापक, 20 वर्षांनंतर पुन्हा शिक्षण घेणारे प्रौढ, किंवा पृथ्वीवरील जीवशास्त्रात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करणारा एक मैत्रीपूर्ण परग्रहवासी असा. खान अकॅडमी ची व्यक्तिगत अभ्यासक्रम तुमच्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
काहीही शिका, अगदी विनामूल्य: हजारो स्वाध्याय, व्हिडिओ आणि लेख तुमच्या हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. आपण गणित, विज्ञान, अर्थशास्त्र, वित्त, व्याकरण, इतिहास,नागरिक शास्त्र, राजकारण आणि बरेच काही अभ्यासू शकता.
झटपट अभिप्राय तसेच प्रत्येक टप्प्यावरील टिपांसह विविध स्वाध्याय, प्रश्नमंजुषा,चाचण्या यांचा सराव करा. तुम्ही शाळेत शिकत असलेल्या किंवा तुम्हाला हव्या असलेल्या धड्यांचा तुमच्या गतीने सराव करा.
तुम्ही ऑफलाइन असताना शिकत रहा: इंटरनेटच्या उपलब्धते शिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा आवडता मजकूर बुकमार्क करा आणि डाउनलोड करा.
तुम्ही जेथून मजकूर सोडला होता तेथून सुरू करा: तुमच्या सध्याच्या शिक्षण पातळीनुसार तयार केलेली, आमची निपुणता प्रणाली पुढे कोणती कौशल्ये आत्मसात करावीत आणि कोणते व्हिडिओ पहावेत यावर त्वरित अभिप्राय आणि शिफारस देते. आणि, तुम्ही विनामूल्य खाते तयार करायचे ठरवल्यास तुम्ही केलेला अभ्यास http://khanacademy.org शी जोडला जाईल. त्यामुळे तुमची प्रगती तुमच्या सर्व उपकरणांवर नेहमीच अद्ययावत राहील.
तज्ञांनी तयार केलेले व्हिडिओ, परस्पर संवादी स्वाध्याय आणि सखोल अभ्यास करून लिहिलेले लेख वापरून गणितातील (अंकगणित, पूर्व-बीजगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सांख्यिकी, कॅल्क्युलस, भिन्न समीकरणे, रेखीय बीजगणित), विज्ञान (जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र) अर्थशास्त्र (सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, वित्त आणि भांडवली बाजार), मानवता ( कलेचा इतिहास, नागरिकशास्त्र, वित्त, यूएस इतिहास, यूएस सरकार आणि राजकारण, जागतिक इतिहास), आणि बरेच काही (संगणक विज्ञान तत्त्वांसह) शिका.
खान अकॅडमी वेबसाइटशी आधीच परिचित आहात? या ॲप मध्ये केवळ मजकूरच उपलब्ध नाही तर सामुदायिक चर्चा, संगणक प्रोग्रामिंग शिकण्यासाठी लागणारी सामग्री, चाचणी तयारी, पालक साधने, शिक्षक साधने आणि जिल्हा साधने या सर्वांचा समावेश थेट http://khanacademy.org वर करण्यात आला आहे
खान अकॅडमी ही 501(c)(3) ना नफा संस्था आहे, ज्याचे ध्येय कोणासाठीही, कुठेही विनामूल्य, जागतिक दर्जाचे शिक्षण प्रदान करणे आहे.
या रोजी अपडेट केले
१३ ऑग, २०२४