जाई या कुमारवयीन युवतीच्या साहसकथांचा आणि चातुर्यकथांचा हा खजिना आजच्या काळातील पिढीलाही नक्कीच भुरळ पडेल. लवंगातीरचा डुगडुग राजा!'' दामाडू -पांचडू , राजा- राण्या, अंडोजी-गुंडोजी, वॉलरस मिस्त्री , शिंगवाला घोडा आणि रड्या सिंह आणि आरसेनगरीत जाईला आलेले जादुई आणि गमतीदार अनुभव याची सैर करायची असेल तर नक्की ऐका - भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी ,"आरसेनगरीत जाई " अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात .