ऋषिकेश गुप्ते हे त्यांच्या गुढ आणि रहस्यमय लिखाणासाठी फेमस आहेत .त्यांच्याच लेखणीतून उतरलेली ही एक परत परत ऐकावीशी वाटेल अशी कादंबरी ! प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळ्या कपारींचे दर्शन घडवणारी......भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी- गोष्ट अजून संपलेली नाही.