एकीकडं जाती-धर्मावर आधारित व्यवस्थेला घरघर लागली असताना उत्क्रांतीच्या या घुसळणीतून एक कट्टर धर्म मात्र तयार झाला आहे, तो म्हणजे पोलीसधर्म ! 'इन्साफ' हा या धर्माचा देव, 'सुव्यवस्था' ही देवी, तर 'बंदोबस्त'ही त्याची आरती आहे. त्यांच्या टेन कमांडमेन्ट्स राज्यघटनेकडून आल्या. या पुस्तकात लेखक - जयंत नाईकनवरे (IPS) याच पोलीस धर्माबद्दल सांगत आहेत. त्यांच्या अनुभवातून आलेले हे लिखाण आपल्याला नक्कीच आवडेल .