तो लहान असताना त्याला छोटासा अपघात झाला होता, पण त्या गोष्टीला कोणी महत्त्व दिलेलं नव्हतं, जसजसा तो मोठा होत गेला, तसं त्याच्या स्मृतीपटलावरून ती घटना साफ पुसली गेली होती. पण याच अपघातामुळे त्याच्या मेंदूतले असंख्य निद्रिस्त सेल्स जागृत झालेले आहेत, याची त्यालाही कल्पना नव्हती. यामुळे भविष्यकाळात घडणाऱ्या घटना त्याला अगोदरच दिसू लागल्या, असं काही वेगळेपण देण्यामागे खरोखरच काही ईश्वरी संकेत असेल, का तो फक्त एक शास्त्रीय चमत्कार असेल? 'झलक', सु.शि.लिखित, जातक शिलेदार या तरुणाच्या आयुष्यातील क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी नि अगतिकतेची गूढ कहाणी!
Skönlitteratur och litteratur