एमबीए करणे हा एक महागडा पर्याय आहे. आर्थिक स्थितीची पर्वा न करता या पर्यायाचं समर्थन करणं अगदीच अशक्य आहे. जॉश कॉफमनने बिझनेस स्कूलच्या निष्फळतेला पर्याय म्हणून PersonalMBA.comची स्थापना केली. त्यांच्या वेबसाईटने लाखो वाचकांना बिझनेससंबंधीच्या सर्वोत्तम पुस्तकांची आणि सर्वकालिक अशा शक्तिशाली व्यावसायिक संकल्पनांची ओळख करून दिली. व्यवसायासंबंधीच्या अत्यावश्यक बाबी या पुस्तकात त्यांनी मांडल्या आहेत. खरे नेते बिझनेस स्कूल्समुळे घडवले जात नाहीत, तर आवश्यक असणार्या ज्ञानाचा, कौशल्यांचा आणि अनुभवांचा शोध घेत ते स्वतःलाच घडवतात. हे पुस्तक ऐकून , स्वतःच्या अटींनुसार आपल्या व्यवसायात यशस्वी होण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल.