महिलांमध्ये उद्योजकता उपजतच असते. काहींना ती सिद्ध करण्याची संधी मिळते, काहींना मिळत नाही. कुटूंब चालवण्यासाठी भाजी विकणं, मेस चालवणं, शिवणकाम करणं असे अनेक उद्योग हजारो महिला करतात. उपलब्ध उद्योगसंधींचा चांगला फायदा करून घेतात. अशाच हरहुन्नरी महिलांमधील उद्योजगता हेरून त्यांच्या व्यवसायाला बळकटी देण्याचं काम 'अन्नपूर्णा' या संस्थेच्या माध्यमातून मेधा सामंत गेली अनेक वर्ष करत आहेत. म्हणजे मेधाताई नेमकं काय करतात? ऐका मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितलेली 'अन्नपूर्णा'ची ही कहाणी.