एका घरात एक विधवा आई , तिचा तरूण मुलगा आणि एक कुत्रा असे तिघेच रहात असतात. एके दिवशी आपल्या मुलाची काहीही चूक नसताना एक गुन्हेगारी वृत्तीचा इसम त्या मुलाचा चाकूने भोसकून खून करतो. आई आपल्या मुलाचा अंत्यसंस्कार करते . ती रडत नाही की ओरडत नाही. आपले दुःख व्यक्तही करत नाही. पण एकीकडे ती फक्त शांतपणे आपल्या मुलाच्या खूनाच सूड कसा घेता येईल याचाच विचार करत असते !