सत्यनारायण गंगाराम पित्रोदा...ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण 'स्वप्नभूमी 'अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय!सत्यनारायणाचा सॅम झाला आणि जागतिक पेटंट्स्च्या मालकीमुळे कोट्य्धीश बनला...पण गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या सॅमना मात्र आपलं ज्ञान आणि गाठीशी असलेला अनुभव आपल्या मायभूमीसाठी वापरावा अशी आस लागली. आणि म्हणून ते भारतामध्ये परतले,तेच एक 'महाध्येयं घेऊन...भारतात 'टेलिकॉम-क्रांती' घडवण्याचं!तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचंही त्यांना पाठबळ लालंणि मग केवळ एक रुपया वेतनावर अविरत कष्ट करणारे सॅम आणि देशाच्या कानाकोपऱ्यात दिसणारे 'एसटीडी / पीसीओ बूथ'म्हणजे एक अतूट समीकरण होऊन गेलं...! © Rohan Prakashan
อัตชีวประวัติและบันทึกชีวิต