भारतावर अनेक परकीय आक्रमकांनी सत्ता गाजवली. कपटी औरंगजेब व धूर्त इंग्रजांनी ह्या देशातील रयतेचे अतोनात हाल केले. ह्या परकीय आक्रमकांवर जे योद्धे तुटून पडले, ज्यांनी ह्या आक्रमकांचा बीमोड केला अशा शूरवीर रत्नांची, त्यांनी केलेल्या पराक्रमाची, स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर त्यांनी दिलेल्या प्राणांच्या आहुतींच्या गोष्टी 'स्फूर्तिदायक कथा' ह्या पुस्तकात दिल्या आहेत. ह्यातून नक्कीच स्फूर्ति मिळेल अशी आशा वाटते.