" अजून हे लोक तुझ्याकडे कसे आले नाहीत?" मी वर्तमानपत्र वाचत माझ्या न्याहारीची वाट पहात असताना म्हणालो. होम्सची न्याहारी आधीच झाली होती आणि तो आरामखुर्चीत शांतपणे पाईप ओढत पडला होता. त्याने आपल्या गुलाबी गाऊनच्या खिशातून एक तारेचा लिफाफा काढून माझ्याकडे फेकला आणि तो म्हणाला, " तू बहुधा फाऊल्स रॉथच्या प्रकरणाबद्दल बोलत असशील असे मी गृहित धरतो आणि तसे असेल तर ही तार वाच !"