प्रश्न सोपा असतो. तो नेहमीच सोपा असतो. अवघड असतं ते उत्तर! इतरांसाठीच्या उत्तरापेक्षाही, मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड. कारण, सगळंच त्यातल्या मूळ रंग-छटांसह स्पष्ट असतं. स्मरणात असतं! मग, कसं फसवणार? मनस्विनीला आलेल्या फोनने तिची धांदल उडते. दोघांचा अपघात, त्यापैकी एक जण तिचा मनमोहन... कोणीतरी एक गंभीर जखमी... कोण असेल तो? जाईपर्यंत मनाला थारा नाही... द्विधा मनस्थितीसारखे विचार पलटत राहणार... काय होणार पुढे... अर्थाचा उलगडा होणार की सगळेच निरर्थ असणार? जाणून घ्या सु.शिं.च्या ओढ लावणार्या कथेत... - 'निरर्थ'.