Želite vzorec dolžine 4 min? Poslušajte kadar koli, celo brez povezave.
Dodaj
O tej zvočni knjigi
आयुष्याची वाटचाल जशी आपण ठरवू तशीच होईल, असे अजिबात नाही. अचानक जीवनाचा सूर पूर्णपणे बदलतो. व्रतस्थ कादंबरीचा नायक हा पी.आर.ओ. आहे. छान नोकरी आणि हवा तसा पैसा येत असल्याने सगळे उत्तम सुरू असतानाच एक स्त्री त्याच्या आयुष्यात येते आणि त्याचे आयुष्य पूर्ण बदलते. लहान मुलं आवडणारा हा नायक स्वतःला मुल होण्यासाठी अक्षरश: धडपडतो. प्रसंगी कठोर असलेला तो लहान मुलांच्या बाबतीत संपूर्ण हळवा आणि भावनिक होतो. अनेक मोह समोर येत असतानासुद्धा; तो का 'व्रतस्थ' असतो? का तो सगळ्यात असूनसुद्धा सगळ्यांपासून दूर असतो? सिध्दहस्त लेखक सुहास शिरवळकर यांच्या अप्रतिम कलाशक्तीमधून अवतरलेली जबरदस्त कादंबरी "व्रतस्थ" आता ऐका स्टोरीटेलवर संदीप खरे यांच्या आवाजात!