भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन ’अदम्य जिद्द’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी केले आहे. चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक, राष्ट्रपती अशी वैविध्यपूर्ण ओळख असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम त्यांच्या चिरंतन विचारांनी आजही जगाला प्रेरणा देत आहेत. ’अदम्य जिद्द’ हे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार आहे. त्यांचा विलक्षण जीवनप्रवास, त्यांचे विचार सर्वांनाच मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरतील. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हे विचार वाचकाला आदर्श जीवनाच्या वाटेकडे घेऊन जातील.