हंग्री टाइड ही कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरातील बेटांच्या विशाल द्वीपसमूहातील एक समृद्ध गाथा आहे. बेटांचा हा विशाल द्वीपसमूहच अमिताव घोष यांच्या नवीन कादंबरीची मांडणी करतो. सुंदरबनमध्ये समुद्राच्या भरती १०० मैलांपेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचतात आणि दररोज हजारो हेक्टर जंगल नाहीसे होते आणि काही तासांनंतर पुन्हा उगवते. याच पार्श्वभूमीवर दुर्मीळ डॉल्फिनच्या शोधात आलेली पियाली, तिला डॉल्फिन शोधण्यात सहाय्यक ठरणारा फोकीर, कनाई या प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी घडते.खारफुटीच्या जंगलातली समृद्ध जलसंपदा, वाघोबाच्या भीतीनं आदिवासी जीवनात उदयाला आलेल्या लोककथा आणि जंगल भयाचं आव्हान पेलतही निसर्गावर मनमुराद प्रेम करणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. जी सुंदरबनच्या जंगलातून अनहद प्रवास घडवते.
AMITAV GHOSH WAS BORN IN CALCUTTA IN 1956 AND RAISED AND EDUCATED IN BANGLADESH, SRI LANKA, IRAN, EGYPT, INDIA AND THE UNITED KINGDOM, WHERE HE RECEIVED HIS PH.D. IN SOCIAL ANTHROPOLOGY FROM OXFORD. ACCLAIMED FOR FICTION, TRAVEL WRITING AND JOURNALISM, HIS BOOKS INCLUDE THE CIRCLE OF REASON, THE SHADOW LINES, IN AN ANTIQUE LAND AND DANCING IN CAMBODIA. HIS PREVIOUS NOVEL, THE GLASS PALACE, WAS AN INTERNATIONAL BESTSELLER THAT SOLD MORE THAN A HALF-MILLION COPIES IN BRITAIN. RECENTLY PUBLISHED THERE, THE HUNGRY TIDE HAS BEEN SOLD FOR TRANSLATION IN TWELVE FOREIGN COUNTRIES AND IS ALSO A BESTSELLER ABROAD. GHOSH HAS WON FRANCES PRIX MEDICI ETRANGER, INDIAS PRESTIGIOUS SAHITYA AKADEMI AWARD, THE ARTHUR C. CLARKE AWARD AND THE PUSHCART PRIZE. HE NOW DIVIDES HIS TIME BETWEEN HARVARD UNIVERSITY, WHERE HE IS A VISITING PROFESSOR AND HIS HOMES IN INDIA AND BROOKLYN, NEW YORK.
अमिताभ घोष यांचा जन्म कलकत्त्याला झाला व ते भारत, बांगलादेश आणि श्रीलंका येथे वाढले. त्यांनी दिल्ली, ऑक्सफर्ड आणि अलेक्झांड्रिया इथे शिक्षण घेतलं. त्यांच्या द सर्कल ऑफ रीजन, द शॅडो लाइन्स, डान्सिंग इन कंबोडिया, द कलकत्ता क्रोमोसोम, द ग्लास पॅलेस, सी ऑफ पॉपीज, रिवर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर आणि द ग्रेट डिरेंजमेंट- क्लायमेट चेंज अँड द अनथिंकेबल या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. घोष यांचे साहित्य वीस पेक्षा जास्त भाषांतून अनुवादित झालं आहे. त्यांनी लोकार्नो चित्रपट महोत्सव, स्वित्झर्लंड आणि व्हेनीस चित्रपट महोत्सवासाठी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे लेख न्यू रिपब्लिक, न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सन 2007 मध्ये त्यांना भारतातील प्रतिष्ठित नागरी सन्मान पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले आहे.
SUNIL KARMARKAR IS CIVIL ENGINEER BY PROFESSION. AFTER SERVING LONG IN MAHARASHTRA GOVERNMENT, HE HAS FOSTERED THE HOBBY OF TRANSLATION POST RETIREMENT. HE HAS TRANSLATED SOME ARTICLES IN THE PAST. TRANSLATION OF THIS NOVEL IS HIS FIRST ENDEAVOR.
सुनील करमरकर, हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता असून महाराष्ट्र शासनाच्या दीर्घकालीन सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनुवादाचा छंद जोपासला आहे. यापूर्वी त्यांनी काही लेख मराठीमध्ये भाषांतरित केले आहेत. प्रस्तुत कादंबरी चा अनुवाद हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे.