स्वातंत्र्योत्तर काळातील पन्नास वर्षात महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, तंत्रवौज्ञानिक, अशा अनेक क्षेत्रांत घडामोडी होऊन प्रचंड स्थित्यंतर झाले. या सर्वांचा एकत्रित परिणाम साहित्यनिर्मितीवरही झाला. अनेक नवनवे साहित्यप्रवाह जन्माला आले. जुने निष्प्रभ झाले. हळूहळू नवेही संथगती झाले. या बदलत्या समाजपरिस्थितीची मीमांसा, साहित्यप्रवाहांचे स्वरूप, त्यांची विविधता, त्यांच्या प्रेरणा, त्यांची एकमेकांपासूनची भिन्नता, पाश्र्वभूमी या सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न एका संवेदनशील साहित्यिक व चिंतनशील समीक्षक असलेल्या साक्षी व्यक्तीने केलेला आहे.