आजच्या विज्ञानयुगाची किमया केवळ अफाट आणि पावलोपावली अचंबित करणारी... या साऱ्यांचीमुळं जरा खणून पाहिली, हजारो-शेकडो वर्षांच्या इतिहासाची पानं खोलवर चाळून पाहिली आणि भूतकाळातल्या शृंखलांना एक-एक जोडून पाहिलं तर समजून येतं की, पूर्वजांच्या ज्ञानार्जनाचं आणि सखोल संशोधनाचंच फलित मिरवतोय आपण... एकंदरीतच, आजच्या विज्ञानयुगाची अलौकिक बीजं पूर्वजांनीच खोलवर रुजवलीत. याच अद्भुत शोधांचा कालौघात लुप्त झालेल्या सांस्कृतिक मूल्यांचा माहितीपूर्ण खजिना!