‘अर्धदशक’ ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात आलेला कादंबरीचा नायक मोहन, करमरकर मॅडमशी केलेली मैत्री त्याला गोत्यात आणते. एकूणच, मोहन आणि त्याचे मित्र पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तीन अडथळे कसे पार करतात याचं वास्तव आणि उत्कंठावर्धक चित्रण करणारी ही कादंबरी आहे, जी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता अधोरेखित करते.
Milind Ramakant Mahangade is a young writer . He completed his graduation from Konkan Krishi Vidhyapeeth , Dapoli. while doing Post graduation from Mahatma Phule Krishi vidhyapeeth , Rahuri , he was selected as Food Safety Officer in Food & Drug Administration , Maharashtra state and since twelve years he is working as Food Safety Officer . His native place is Pasarni in Wai Tehsil and currently he is living in Ambernath , Dist - Thane . He is fond of reading , skeching and writing. He started writing blog named www.milindmahangade.blgspot.
मिलिंद रमाकांत महांगडे हे युवा लेखक असून ते कृषी शाखेचे पदवीधर आहेत . त्यांनी कृषी शाखेची पदवी कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून घेतली आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी येथे सुरू असतानाच त्यांची महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली व ते गेली बारा वर्षे त्या पदावर कार्यरत आहेत . त्यांचे मूळ गाव वाई तालुक्यातील पसरणी हे असून ते सध्या अंबरनाथ , जिल्हा , ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांना वाचन, चित्रकला आणि लेखनाची आवड आहे.