`आपण सर्व स्वत:च्या कृतीचे पोलीस झालो तर ती फार मोठी क्रांती ठरेल.'' ``सुधारणा, वाईट गोष्टी रोखणे आणि चांगल्याचा अंमल करणे, यासाठी पोलीससेवेची सत्ता वापरता येते.'' ``ही सेवा मानवी हक्कांचे संरक्षण करू शकते अन् पायमल्लीही करू शकते. यातील काय निवडायचे ते या सेवेत असणारे आणि येऊ पाहणारे, यांनीच ठरवायचे आहे.''``आज आपल्या देशातील पोलीससेवा काही राजकारणी वापरतात. आपला वापर होऊ द्यायचा की नाही हे आपणच ठरवू शकतो.'' ``ही सेवा सुलभ आणि परिणामकारक व्हायची असेल, तर सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करायला हवी. असे द्रष्टे, कुशल, समर्पित नेतृत्व या सेवेतून पुढे यायला हवे अन् ते तळापर्यंत झिरपायला हवे आहे.'' पोलीससेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि नीतिमान कशी होईल यावर आपल्या दीर्घ, डोळस अनुभवाचे विचार मांडणाNया डॉक्टर किरण बेदी, वाचकांना या पुस्तकाद्वारे आपल्या संवेदना, सहभाग आणि प्रतिक्रिया देण्यासाठी उद्युक्त करतात.