पुनर्वसन केंद्रातील अपंग जवानांच्या वास्तव कहाण्यांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली कादंबरी आहे ‘अथक.’ कर्नल मुखर्जी या पुनर्वसन केंद्राचे प्रमुख आहेत. नायक सुरेश कार्की यांचं छातीपासून खालचं शरीर एका अपघातामुळे लुळं झालं. पुण्यातील खडकीच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दाखल झाले. आता त्यांनी बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य प्राप्त करून जागतिक क्रमवारीत स्थान पटकावलं आहे. मृदुल घोष हा जवान विमानांची देखभाल-दुरुस्ती करणारा. अपघातात त्याचं मानेपासून खालचं शरीर लुळं पडलं; पण आता तो तोंडात ब्रश घेऊन उत्तम चित्र काढतो. अशा आणखी काही जवानांच्या कहाण्या यात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शेफाली आणि क्षितिज हे तरुण-तरुणी सर्वसामान्य अपंगांसाठी कन्नू मेहता सेंटर सुरू करतात. जवानांच्या प्रचंड इच्छाशक्तीचीR आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य अपंगासाठी सेंटर सुरू करणार्या शेफाली आणि क्षितिजची ही प्रेरणादायक कहाणी.
SWATI CHANDORKAR BELONGS TO THE NEW GENERATION OF WRITERS. SHE HAS ABOUT TEN TITLES TO HER CREDIT, WHICH INCLUDES A BIOGRAPHY, SHORT STORY COLLECTIONS, AND TRANSLATIONS. MASTERY IN REIKI AND FENG SHUI. FOUND OF ALL KINDS OF ART.
स्वाती चांदोरकर या होमसायन्सच्या पदवीधर आहेत. ’वपु : एक अमृतानुभव’ या कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या आहेत. संगीत, नृत्य, रेकी, पेंटिंग, नाट्याभिनय यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलं आहे. त्यांच्या ’फॉरवर्ड अँड डिलिट’ या कादंबरीला 2014मध्ये नांदेडचा ’प्रसादबन’ पुरस्कार प्राप्त झाला. तर, 2014 मध्ये ’आणि विक्रमादित्य हरला’ या कथासंठाहासाठी त्यांना दोन पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा एक आणि दुसरा पुणे मराठी ठांथालयातर्फे देण्यात येणारा ’राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार.’