जगातला सगळ्यांत प्रभावशाली माणूस म्हणून अमेरिकी राष्ट्रपतीचं वर्णन केलं जातं. अमेरिका ही एकमेव जागतिक महासत्ता असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपतीच्या धोरणांवर आणि बारीकसारीक निर्णयांवर जगाचंही भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. अनेकदा तर भारतासारख्या देशामध्ये अंतर्गत धोरणांपेक्षा अमेरिकेनं उचललेल्या एखाद्या पावलाचे परिणाम जास्त दिसून येतात. म्हणूनच, अमेरिकी राष्ट्रपतींची अत्यंत सखोल आणि रंजक ओळख करून घेणं, अगदी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनंही महत्त्वाचं आहे. यातून अमेरिका कशी घडत गेली आणि जगावर आपला प्रभाव कसा टाकत गेली, याचीही ओळख आपल्याला होईल. जॉर्ज वॉशिंग्टनपासून बराक ओबामापर्यंत आजवरच्या एवूâण एक अमेरिकी राष्ट्रपतींचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची कारकीर्द, तेव्हाची परिस्थिती आणि एकूणच त्यांच्या कामगिरीचे दूरगामी परिणाम या सगळ्या गोष्टींची सोप्या शब्दांमध्ये मांडणी करणारं हे पुस्तक आहे.