`हिलरी क्लिंटन' ही आहे हिलरीची संघर्षगाथा, तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाची. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनची पत्नी.... सिनेटर पद आणि परराष्ट्र मंत्री पदासह विविध पदे भूषवलेली... विविध पुरस्कार लाभलेली... दोनदा राष्ट्रपती पदाची उमेदवार ठरलेली... मुलगी, पत्नी, आई आणि प्रसारमाध्यमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून स्वत:ला सिद्ध करू पाहणारी एक स्त्री ही प्रत्येक भूमिका मनापासून जगणाऱ्या हिलरीचा प्रेरणादायक जीवनप्रवास.
Atul Kahate is a Graduate in Statistics & has done his MBA. He has worked for in 18 years in Information Technology industry where he has handled various responsibilities at Syntel, American Express, Deutsche Bank, L&T Infotech and Oracle Financial Services. He has various bestselling Marathi books to his credit on various topics such as History, Economics, Medicine, International Politics, Science, Technology, Biography, and Cricket. He has received various awards for his contribution in writing. He is also a regular contributor to Marathi newspapers and TV channels.
अतुल कहाते संख्याशास्त्राचे पदवीधर आहेत. एम.बी.ए. ही पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे १८ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सिंटेल, अमेरिकन एक्स्प्रेस, डॉयचे बँक, एल अँड टी इन्फोटेक आणि आयफ्लेक्स सोल्यूशन्स (आता ओरॅकल) इथे डायरेक्टर पदासह विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सिंबायोसिस, तसेच पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत अभ्यागत व्याख्याता म्हणून एक दशकाहून अधिक काळाचा त्यांचा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये ३० आणि मराठीत ४० अशी ७० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. संगणक क्षेत्रातल्या विद्याथ्र्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.