अग्रेसर महिला पायलट अमिलिया एयरहार्टची विलक्षण कथा! ‘अटलांटिक समुद्रावरून विमान चालवणारी पहिली महिला पायलट’ असा मान मिळवण्यासाठी अमिलिया निघाली होती. संपूर्ण सफरीतला प्रत्येक क्षण तिच्या धैर्याची कसोटी पाहणारा होता. पहिल्या काही तासांनंतरच विमानाच्या पंख्यावर ठेवलेल्या इंधनाने पेट घेतला. तितक्यात विमानासमोर अचानक ढग जमा झाले आणि काचांवर बर्फाचा थर साचला. त्यानंतर विमान प्रचंड वेगाने स्वतःभोवतीच गरागरा फिरू लागलं आणि कुठल्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीला येऊन ठेपलं... शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेत जन्मलेल्या अमिलिया एयरहार्टला आकाशाला गवसणी घालण्याचं प्रचंड वेड होतं. या वेडापायी तिने अचाट धाडसं आणि अनेक विक्रम केले. एव्हिएशन क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं म्हणून ती अखेरपर्यंत झटत राहिली आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर अजरामर झाली.
Google Play থেকে কেনা অডিওবুক আপনি কম্পিউটারের ওয়েব ব্রাউজারে শুনতে পারেন।
eReader এবং অন্যান্য ডিভাইস
Kobo eReaders-এর মতো e-ink ডিভাইসে পড়তে, আপনাকে একটি ফাইল ডাউনলোড ও আপনার ডিভাইসে ট্রান্সফার করতে হবে। ব্যবহারকারীর উদ্দেশ্যে তৈরি সহায়তা কেন্দ্রতে দেওয়া নির্দেশাবলী অনুসরণ করে যেসব eReader-এ ফাইল পড়া যাবে সেখানে ট্রান্সফার করুন।