डॉ. अमोल अन्नदाते हे बालरोगतज्ज्ञ व नवजातशिशुतज्ज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील नव उद्यमी म्हणजेच Eentrepreneur, लेखक , वक्ते , आरोग्य क्षेत्रातील समाज सुधारक, व महाराष्ट्रातील राजकीय , समाजिक व प्रसार माध्यमांमध्ये वावर असलेले एक नावाजलेले डॉक्टर आहेत. ग्रामीण आरोग्य, वैद्यकीय शिक्षण , देशाच्या व राज्याची आरोग्य धोरणांचे विश्लेषक म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे. आनंद चॅरीटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते ग्रामीण आरोग्याशी निगडीत समाजिक उपक्रम राबतात. वैजापूर येथे २५० खाटांचे आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे धर्मदाय रुग्णालय तसेच आनंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हा शैक्षणिक संस्थांचा समूह त्यांनी स्थापन केलाय.
लहान मुलांच्या मानसिक समस्या व कुमारवयीन मुलांच्या समस्यांवर सखोल अभ्यासाअंती त्यांचे समुपदेशन व लेखनाची नोंद राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते.
वैद्यकीय व सामाजिक विषयांवरील पत्रकारिता व लेखन ते गेली बारा वर्षं करत आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी वाहिन्यांवर चर्चा, मुलाखतींमध्ये त्यांचा सहभाग असतो. ‘हे बोलायलाच हवे’ व ‘वैद्यकीय बोधकथा’ ही मराठी पुस्तके व ‘Its high time we talk’ हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे. डॉ. अमोल अन्नदाते समाजमाध्यमांवर सक्रीय आहेत व फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्राम, ट्वीटर वर जगभरातून वाचक त्यांना फॉलो करतात.