‘भारुकाकाची पत्रे’ हे श्री. महेंद्र जी. बैसाणे या संवेदनशील मनाच्या आणि समाजमनस्क वृत्तीच्या लेखकाचे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांशी/मुलांशी साधलेला सुसंवाद आहे. यशस्वितेचा गुरुमंत्र देणारा प्रेराणास्त्रोत आहे.
संघर्ष आणि स्पर्धा यांच्या जाणीवेने आजचा विद्यार्थी अधिकच संवेदनशील झाला आहे. या स्पर्धेत स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी धडपडताना आपल्याला काहीतरी हवे आहे. पण नक्की काय मिळवायचे आहे, पण कसे? त्यासाठी काहीतरी करायला हवे पण नक्की काय करावे या प्रश्नांच्या भोवर्यात आजचा विद्यार्थी सापडला आहे आणि करीअर या परवलीच्या चक्रव्युहात अडकलेला आहे. मार्ग शोधतो आहे. ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ हे त्याला कळते आहे. त्यासाठी प्रयत्नांची, कष्टांची तयारीही आहे. परंतु अपयश पचवण्यासाठी ताकद नाही आणि यशाचा नक्की मार्ग असपडत नाही. अशा भांबावलेल्या मनःस्थितीतील मुलांना भारुकाकाची पत्रे हा प्रकाशाचा मार्ग दाखवणारा प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
‘ध्येय शिखर’ स्वतःचे ध्येय निश्चित करून ते सर करण्यासाठी अथक परिश्रमांची प्रेरणा देण्यासाठी भारुकाकांनी अनेक आदर्श व्यक्तिमत्वांची उदाहरणे मुलांसमोर ठेवली आहेत. त्यांच्या आज दिसणाऱ्या यशाच्या मागे असलेली त्यांची तपश्चर्या, जिद्द व परिश्रम यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली आहे.
सदर पुस्तक म्हणजे भारुकाकांनी विद्यार्थ्यांशी/मुलांशी साधलेला संवाद आहे. पत्रांच्या पाना पानावर विद्यार्थ्यांसाठी आशावाद, ध्येय निश्चितीची प्रेरणा, प्रयत्नांची दिशा आणि यशस्वितेचा कानमंत्र आहे.
‘ईच्छा असेल तर मार्ग दिसेल’ हे अनेक उदाहरणांनी पटवून देत हि पत्रे मुलांना स्वतःचे ध्येय निश्चित करण्यास प्रेरित करतात आणि ते गाठण्यासाठी कार्य-प्रवृत्त करतात हे निश्चित. आणि हेच या पुस्तकाचे यश आहे. लढण्याची शक्ती आणि जिंकण्याची प्रेरणा देणाऱ्या या संवादाची मुलांना आज खरंच खूप गरज आहे. सुदृढ समाज रचनेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत व प्रत्येक पालकांपर्यंत भारुकाकाचा हा पत्ररूपी संवाद ‘ध्येय शिखर’ पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी या पुस्तकाला नव्हे तर सुसंवादाला मनापासून शुभेच्छा!
विद्यार्थ्यांबरोबर पालकांशीही साधलेला संवाद हे पुस्तकाचे आणखी वैशिष्ट्य आहे. श्री.महेंद्र जी. बैसाणे यांचे हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःमधील क्षमतांची जाणीव होऊन स्वतःच्या सर्वंकष विकासासाठी ‘अत्त दीप भव’-तूच स्वतःचा दीप हो या महामंत्राची दीक्षा देणारा प्रेरणास्त्रोत आहे.
या पत्रांतील काही पत्रे या पूर्वी आपण ‘शिक्षण संक्रमण’ मधून वाचलेली आहेत. आता संपूर्ण पुस्तक रूपाने असलेल्या या पत्रांचे आपल्याकडून स्वागत होईलच.
या सुसंवादाला पुन:श्च हार्दिक शुभेच्छा!
सौ.उज्ज्वलादेवी पाटील
माजी अध्यक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.
नांव:-महेंद्र गौरीकुमार बैसाणे (‘भारुकाका’ या नावाने बहुतेकदा पत्ररूपी लिखाण)
अल्प-परिचय
शिक्षण:-विद्युत अभियांत्रिकीची पदविका तसेच साहित्याची पदवी व व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी. एनएलपी प्रशिक्षित.
नोकरी-व्यवसाय:-आकाशवाणी-दुरदर्