ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट आणि रिइन्व्हेन्शन या पुस्तकांसह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात.