मॅरी बफेट या प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्या गुंतवणुकीच्या तंत्रांवर आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या लेखिका आणि वक्त्या आहेत. त्या मल्टिमिलियन डॉलर्सच्या एका चित्रपट संपादन संस्थेच्या सीईओदेखील आहेत. या संस्थेच्या ग्राहकांमध्ये कोका-कोलापासून मॅडोनापर्यंतचा समावेश आहे.
डेव्हिड क्लार्क हे तीस वर्षांपासून जास्त काळ पोर्टफोलियो मॅनेजर आणि बफेट कुटुंबीयांचे मित्र आहेत. त्यांना वॉरेन बफेट यांच्या गुंतवणूक तंत्रांचे अग्रगण्य जाणकार मानले जाते.