संभाषणातून सुसंवाद ही एक कला आहे. त्याचं माध्यम शब्द. योग्य त्या पद्धातीने त्याचा उपयोग करून जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्लीच...आपल्या अंगातली हुशारी दाखवायची असेल, तर संभाषण हे करावंच लागतं. ज्याला संभाषणातून सुसंवाद साधता येतो, तोच खरा कर्तबगार ठरतो. वरिष्ठ त्याच्याच बाजूनं कौल देतात. सहकारी त्याच्याच बाजूनं उभे राहातात. आपतेष्ट त्याचंच ऐकतात. ग्राहक अशाच व्यापाराची भरभराट करतात. एवढंच नाही, तर नशीबसुद्धा त्याच्याच बाजूनं कौल देतं. ह्याचा अर्थ सगळ्यांची हांजी हांजी करायची असं नाही, तर चार शब्द देताना आणि घेताना थोडीशी काळजी घ्यायची. ती आपाल्याला कशाप्रकारे घेता येईल, ह्याबद्दल काही अनुभव लिहिले आहेत. ते तुम्ही वाचलेत तर तुम्हालाही ते नक्कीच उपायोगी पाडतील.