रस्किन बाँड यांचा जन्म 1934 साली कसौली इथं झाला आणि त्यांचं बालपण जामनगर, डेहराडून, दिल्ली आणि शिमला इथं गेलं. इंग्लंडमध्ये चार वर्षं राहिल्यानंतर ते 1955 साली भारतात परतले. त्यांनी ‘द रूम ऑन द रूफ’, ‘अ फ्लाइट ऑफ पिजन्स’, ‘द ब्लू अंब्रेला’, ‘रेन इन द माउंटन्स’ आणि ‘अ बुक ऑफ सिंपल लिव्हिंग’ यासारखी ललित, ललितेतर आणि कवितांची अशी एकूण शंभराहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. 1956 साली जॉन लेवेलिन ऱ्हीस प्राइझनं त्यांना सन्मानित करण्यात आलं; तर 1993 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1999 साली पद्मश्री; तर 2014 साली पद्मभूषण सन्मान त्यांना देण्यात आले.