सीतेला लक्ष्मणाच्या नाकपुड्या थरथरताना दिसल्या. तिला त्याचं अवघडलेपण आणि संताप कळला. पुढे जाऊन त्याला आश्वस्त करावं असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला आवरलं.
"रामाने त्याच्या सीतेला टाकलं आहे असं तुला वाटतय, होय ना ?' तिने मृदुपणे विचारलं.
"पण तसं करूच शकत नाही.
तो देवी आहे - . तो कुणाचाच त्याग करत नाही.
आणि मी देवी आहे -. कुणीच माझा त्याग करू शकत नाही."
कोड्यात पडलेला लक्ष्मण अयोध्येला परतला. सीता वनात थांबली, हासील आणि तिने केस मोकळे सोडले.
देवदत्त पट्टनाईक हे शिक्षणाने मेडिकल डॉक्टर असून व्यवसायाने नेतृत्वसल्लागार आहेत व आवडीने पुराणकथा अभ्यासक आहेत. त्यांनी पवित्र कथा, प्रतीके, विधी आणि त्यांची आधुनिक काळाशी संगती यावर भरपूर लेखनव्याख्यान केले आहे. पेंग्विन इंडियाबरोबरच्या त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत द हांडबुक ऑफ राम, मिथ=मिथ्या, अ हांडबुक ऑफ हिंदू मायथोलाजी, द प्रेग्नेनट किंग, जयः अनइलस्ट्रेटेड रीटेलिंग ऑफ महाभारत आणि मुलासाठीची देवलोक माला. देव्दतांची अपारंपरिक पद्धत आणि गुंतवून टाकणारी शैली त्यांच्या व्याख्यानामधून, पुस्तकामधून आणि लेखामधून प्रत्ययाला येते.