मराठ्यांच्या राष्ट्रजीवनातील अत्यंत कठीण अशा काळात अकरा वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजारामांची चरितकहाणी आहे ‘शिवपुत्र राजाराम.’ मराठी सरदार आणि मुत्सद्दी यांना एकत्र आणून बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला टक्कर देण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, त्यांच्या शौर्याला, आक्रमक वृत्तीला पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत मराठी वीरांनी उभारलेल्या प्रखर स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या राजाराम महाराजांची तेजस्वी जीवनगाथा.
‘Dr. Pramila Dwarkanath Jarag, born on 23rd January 1947 in an highly educated and progressive family, She is a gynaecologist and renowned social and cultural activist. For her social work particularly in the field of women and child development, she has received many prestigious awards like ‘ Stree Sakhi Sanman’ by daily Lokmat, ‘ Savitribai Phule award’ by Rajmata Jijau Prathishthan and most important ‘ Woman achiever’ award by Maharashtra State Women Rights Commission. She is also selected on many Central and State leval Government committees in this field.
डॉ. प्रमिला जरग यांनी एमबीबीएस, डीजीओ झाल्यावर स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून व्यवसाय सुरू केला. त्याबरोबर त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रिय राहिल्या. त्यांनी कालांतराने सामाजिक कार्याला वाहून घेतले. आई कमलाबाई मोरे यांनी पन्नास वर्षांपूर्वी महिला जीवन संवर्धक मंडळ, माझे माहेर या समाजातील निराधार व गरजू महिला व मुलांसाठी स्थापन केलेल्या, मुंबई व कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या संस्थेची धुरा त्या गेली ४० वर्षे सांभाळत आहेत. महिला व बालविकास या क्षेत्राविषयी विशेष आस्था असल्याने त्या अनेक सरकारी समित्यांवर कार्यरत असतात. प्रखर सामाजिक भान, ठाम भूमिका आणि संवेदनशीलता ही वैशिष्ट्ये असलेल्या डॉ. प्रमिला जरग यांनी आजवर महिला, मुले, सामाजिक विषय यांच्यावर लेख व सदर असे विपुल वृत्तपत्रीय लेखन केले आहे.