It is indeed a herculean task to write a biography. The writer should possess the qualities of a novelist and a biographer too. The biographer mainly has a mind that of a researcher, at the same time, he is a collector of things. A novelist mainly works on innovative ideas, he creates ideas and the biographer simply puts the past things into words not changing any aspect or not giving any dimension to things. Both the novelist and the biographer have to research a lot before starting on some work, and that too with utmost dedication. An author has to study the character in detail, not only this, he has to study the contemporary situation, the people, the family members of the one whose biography is to be written, his friends, his rivals, his relation with the society as such, his work, its nature, its importance, etc. He has to study everything with a new angle. Even though the ready material is available from the biographer the novelist has to go through it again and again, not missing any single detail. Many a times he has to research again not just for confirmation or verification but to make sure that no false information is quoted anywhere. He prepares himself fully as good as the biographer, but then settles down to give it a form of novel. He does not intend to narrate about the life of the concerned person. On the contrary, he has to reveal the true qualities of the great personality to people. He has to pen down very precisely the events related to the concerned person and the others around him. A researcher does not write anything which has no base. But a biographer cum novelist has to come out of this role, he has to think and act like a creator. When he is an innovator he still has to retain the role of a researcher. When the best out of these two is blended together properly then only the biography cum novel is a success. M. V. Dhond. Mahatma is a biography cum novel, exploring the wonderful blend of the personality, the work done and the revolutionary thinking of Jyotiba Phule. .चरित्रात्मक कादंबरी लिहिणे ही एक मोठी कठीण साधना आहे. त्याकरिता लेखकाच्या अंगी चरित्रकार व कादंबरीकार या दोहोंचेही गुण असावे लागतात. चरित्रकार हा मुख्यत: संशोधक व संचयक असतो; तर कादंबरीकार हा मुख्यत: सर्जक असतो. चरित्रात्मक कादंबरीचा लेखक हा संशोधक, तसाच सर्जकही असावा लागतो. कादंबरी लिहायला घेण्यापूर्वी त्याला चरित्रकाराएवढीच पूर्वतयारी करावी लागते; आणि ती करीत असता संशोधकाचे व्रत कठोरपणे पाळावे लागते. ज्याच्यावर कादंबरी लिहावयाची, त्याचे उत्कृष्ट चरित्र आधीच लिहिले गेले असले, तरीही चरित्रनायकाचा काळ, त्याचे कुटुंबीयांशी, स्नेह्यांशी, विरोधकांशी – एवंâदर समाजाशी असलेले संबंध, भावबंध, त्याच्या कार्याचे स्वरूप व महत्त्व, इ.इ. गोष्टींचे पुरे आकलन होण्याकरता चरित्रकाराने केलेल्या संशोधनाचा त्याला नव्याने मागोवा घ्यावा लागतो; एवढेच नव्हे, तर त्याच्याहूनही अधिक संशोधन करावे लागते. ही सर्व पूर्वतयारी झाल्यावरच तो कादंबरी लिहिण्यास पात्र होतो. चरित्रलेखकाएवढीच पूर्वतयारी केल्यावर तो चरित्र लिहावयास न घेता कादंबरी रचण्यास प्रवृत्त होतो, याचे कारण त्याला त्या व्यक्तीच्या जीवनाचे निवेदन करावयाचे नसते, तर त्याच्या जीवनाचा साक्षात्कार घडवावयाचा असतो. त्याकरता त्याचा चरित्रनायक व त्याच्याशी संबंध आलेल्या व्यक्ती यांच्या मनांचे व्यापार कृती-उक्तींच्या द्वारे चित्रित करणे आवश्यक असते. हे साधण्याकरता ‘नामूलं लिख्यते विंâचित्’ ही संशोधकाची प्रतिज्ञा विसरून, सर्वज्ञ अशा सर्जकाची भूमिका घेणे त्याला प्राप्त होते; परंतु केवळ पूर्वतयारीच्या वेळी संशोधक आणि निर्मितीच्या वेळी मात्र सर्जक, अशा या दोन अलग अलग भूमिका नसतात. सर्जकाची भूमिका वठवताना संशोधकाची भूमिका त्याला टाकता येत नाही. या दोन्ही भूमिकांतील गुणांची शय्या त्याच्या लेखनात जेव्हा उत्कृष्ट जमते, तेव्हाच चरित्रात्मक कादंबरी यशस्वी होते.