डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी हे एक बहुवेधी व्यक्तिमत्व आहे. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, क्रीडा, शेर-शायरी अशा विविध क्षेत्रांमध्ये अधिकारवाणीनं संचार करणारं. व्यासंग आणि रसिकता यांचा सुरेच मेळ असलेलं. म्हणूनच कमालीचं वैविध्यपूर्ण आणि रसरशीत शैलीनं नटलेलं असं लेखन हे त्याचं वैशिष्ट्य ठरतं. संगीताच्या मैफलीपासून गूढगुंजनाचा शोध घेणा-या विज्ञानापर्यंत अनेक विषयांचा रसग्राहक, शोधक मागोवा ते घेतात; आणि वाचकाला आपल्याबरोबर रमणीय विश्वात रमवतात... 'अज्ञाताचे विज्ञान' ही आहे त्यांने घडविलेली अशीच एक आगळीवेगळी सफर....