आजकाल आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’ यातील कथांमध्ये दिसते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजालात रोहन, पपा सुटावेत यासाठी विलक्षण तडजोडी करणारी ममी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणाऱ्या यशवंतला मदत करणाऱ्यांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो. विक्षिप्त आप्पा, आपल्या नवऱ्याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे तर्हेवाईक झालेली आप्पांची मुलगी नीलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्या-फार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात.