Gulzar Sahab directed his first film Mere Apne in 1971. The film was a remake of Tapan Sinha's Bengali film Apanjan (1969). From there Gulzar Sahab’s journey as a director begun. He had 19 fascinating films on his name which are penned & directed by himself. These films are those masterpieces of the Bollywood which sets new trends of emotional cinema. These films are not only drama on the screen but they are literary masterpieces too. One can lost himself in the mesmerizing script of Gulzar. ‘Gulzar Patkatha’ is a combo of such 19 scripts. This includes Mere Apne, Parichay, Koshish, Achanak, Aandhi,Kitab,Khushaboo,Meera,Masoom,Mausam,Angoor,Libas,Lekin,Hututu, Maachis,Izazat,New Delhi Times,Namkin & Kinara. These scripts tells stories of human relationships entangled in social issues. They talks about purity of emotions & love affected by politics.
Libaas is a story of extra-marital affair of an urban couple. Mausam pictures a story of a father who tries to improve the life of his prostitute-son. In Maachis, a young Punjabi boy engages in terrorism to fight a bad situation only to realise its temporary nature. Hu Tu Tu dealt with corruption in India and how a man decides to fight it. Koshish based on the struggle faced by deaf-dumb couple & Achanak based on 1958 murder case KM Nanavati v State of Maharashtra whereas script like Angoor is based on Shakespeare's play The Comedy of Errors.
गुलजारांनी 1971 साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॅलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला. गुलजारांच्या लेखनीतून 19 पटकथा अवतरल्या, ज्यांना पडद्याचा दृश्यरुपी आयामही स्वतः गुलजारांनीच दिला. या कथांमध्ये निव्वळ रुपेरी पडद्यावरचं नाट्य नव्हतं, तर त्यात प्रगल्भ साहित्यमुल्य होतं. म्हणूनच या कथा रसिकवाचकांना परकायाप्रवेशाचा परम आनंद देऊ शकतात. यात मेरे अपने, परिचय, कोशिश,अचानक,आंधी,किताब,खुशबू,मीरा,मासूम,मौसम,अंगूर,लिबास,लेकिन,हुतूतू,माचिस,इजाजत,न्यू देहली टाईम्स, नमकिन आणि किनारासारख्या पटकथांचा समावेश आहे. सामाजिकतेच्या चक्रात बाधित होणाऱ्या नातेसंबंधांचं प्रतिबिंब या कथांमध्ये उतरतं. भावनांमधला सच्चेपणा आणि राजकारणानं ग्रासणारं प्रेम यात भेटतं.
लिबासमध्ये विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणारी नातेसंबंधांची घालमेल दिसते. तर मासूममध्ये अशाच प्रकारच्या संबंधांमुळं होरपळलेल्या चिमुरड्यांचं भावविश्व दिसतं. माचिसमध्ये दहशतवादाशी लढा देणारा पंजाबी तरुण भेटतो, तर हुतूतूमध्ये देशाला ओरबाडणाऱ्या भ्रष्टाचाराचं अस्वस्थ करणारं चित्रण दिसतं. मुकबधिरांचा संवादासाठीचा कोशिशमधला संघर्ष डोळ्यात अंजन घालतो तर शेक्सपिअरच्या द कॅमेडी आफ एरर्सवर आधारलेला अंगूर निर्मळ विनोदाची यथेच्छ अनुभूती देतो.