Ishwar Kon Mi Kon (Marathi)

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4,0
8 reviews
E-boek
176
Pagina's
Beoordelingen en reviews worden niet geverifieerd. Meer informatie

Over dit e-boek

स्व-चौकशीचा मार्ग


'मी कोण आहे? युगानुयुगांपासून मनुष्याला पडलेला प्रश्न! मनुष्य स्वतःला कधी शरीर मानतो, तर कधी मन. शिवाय एखादी नवकल्पना स्फुरताच तो म्हणतो, 'मी विचार केला.' म्हणजेच यावेळी तो स्वतःला बुद्धी मानत असतो. थोडक्यात, त्याच्या जाणिवांचं विश्व शरीर-मन-बुद्धीपुरतंच सीमित असतं. मग स्वतःच्याच संकुचित वृत्तीत अडकलेला मनुष्य सर्वोच्च आनंदाप्रत कसा बरं पोहोचू शकेल? तेच लोक या आनंदाचे धनी होऊ शकतात, जे स्व-चौकशीच्या आधारे स्वतःच्या असली अस्तित्वाचा प्रामाणिकपणे शोध घेतात. स्व-चौकशीच्या मार्गावर चालणारा मनुष्य मोहमायेचा भवसागर सहजतया पार करू शकतो. कारण त्याच्या अंतर्यामी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव प्रखर होऊ लागते, एक शाश्वत सत्य त्याच्या मनात वास्तव्य करू लागतं. या अवस्थेला कोणी 'आत्मसाक्षात्कार', कोणी 'मोक्ष', 'मुक्ती', 'समाधी', 'निर्वाण', तर कोणी 'कैवल्य' म्हणतात.
आपणही या सर्वोच्च अवस्थेत स्थापित व्हावं, यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक. आध्यात्मिक विश्वातील नवक्रांतीचा अनुभव घेण्यासाठी या पुस्तकाचा प्रत्येक सत्यप्रेमीने लाभ घ्यायलाच हवा...

Beoordelingen en reviews

4,0
8 reviews

Over de auteur

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Dit e-boek beoordelen

Geef ons je mening.

Informatie over lezen

Smartphones en tablets
Installeer de Google Play Boeken-app voor Android en iPad/iPhone. De app wordt automatisch gesynchroniseerd met je account en met de app kun je online of offline lezen, waar je ook bent.
Laptops en computers
Via de webbrowser van je computer kun je luisteren naar audioboeken die je hebt gekocht op Google Play.
eReaders en andere apparaten
Als je wilt lezen op e-ink-apparaten zoals e-readers van Kobo, moet je een bestand downloaden en overzetten naar je apparaat. Volg de gedetailleerde instructies in het Helpcentrum om de bestanden over te zetten op ondersteunde e-readers.