सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. स्पर्धा-परीक्षा, दूरचित्रवाणी हिन्यांवरील प्रश्नोत्तराचे कार्यक्रम यांमुळं सामान्यज्ञान हा परवलीचा शब्द बनला आहे. जनरल नॉलेज हे काही एका दिवसात पाठ करून प्राप्त होणारं ज्ञान नव्हे. विशेषत: वैज्ञानिक माहिती मिळवताना अगदी एकाच प्रश्नाचं उत्तर माहिती करून घेताना आजूबाजूचे संदर्भ माहिती झाले, तर उत्तर लक्षात ठेवणं सोपं जातं. तिखटाचा तिखटपणा मोजण्याचं परिमाण कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तिखट खाणाऱ्यांना देता येणार नाही; पण हे पुस्तक वाचणारा ते उत्तर नक्कीच देऊ शकेल. हे पुस्तक म्हणजे अशा बऱ्याच चित्रविचित्र वैज्ञानिक माहितीचे आणि भौगोलिक प्रश्नांच्या उत्तरांचे भांडार असल्याने ते घरोघरी नक्कीच उपयुक्त ठरेल.
Znanstvena fantastika in fantazija