JOHAR MAI BAP JOHAR

· MEHTA PUBLISHING HOUSE
ઇ-પુસ્તક
352
પેજ
રેટિંગ અને રિવ્યૂ ચકાસેલા નથી વધુ જાણો

આ ઇ-પુસ્તક વિશે

संत परंपरेतील महान विट्ठल भक्त संत चोखामेला यांच्या आयुष्यावारिल मनोवेधक कादंबरी

चोखोबा तर कधीपासून या दिवसाची प्रतीक्षा करत होता. दीपमाळ तर कधीच बांधून झाली होती. सगळ्या पणत्यांतून तेल-वात घालून झाली, तेव्हा शुक्राची चांदणी आकाशात दिसत होती. दोन्ही दीपमाळांवरच्या सगळ्या पणत्यांच्या वाती त्यानं पेटवल्या आणि क्षणार्धात सारा आसमंत तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला. त्या गहिऱ्या अंधारात त्याची आभा क्षितिजापर्यंत पोहोचली आणि क्षितीजही प्रकाशमान झालं. चंद्रभागेच्या पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमध्ये त्या पणत्यांची लक्षावधी प्रतिबिंबं हिंदकळून परावर्तित झाली आणि त्यांच्या तेजानं चंद्रभागा नदीचा कणन्कण जणू थरारला. दोन्ही काठ लख्ख उजळून निघाले. चंद्रभागेचं सगळं पाणी लखलखत होतं आणि चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर अंगभर पणत्यांचं प्रकाशमंडळ लेवून लखलखणार्या दोन दीपमाळा उभ्या होत्या. त्या पणत्यांच्या प्रकाशानं चंद्रभागेचं पाणी तेजाळलं होतं. परिसरातल्या साऱ्या अंधकाराला छेदत प्रकाशाची ती रेषा सगळा आसमंत उजळून टाकत होती. अंधकाराला छेदत ती प्रकाशरेषा चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर वसलेल्या पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. विठ्ठलाची अवघी मूर्ती उजळली. विठ्ठलाच्या सावळ्या मूर्तीवर तर ते प्रकाशाचे बिंदू अंगभर लेवून जणू दिमाख मिरवीत होते. पूजा बांधण्याच्या आधीच विठ्ठलाची ती सावळी मूर्ती विलक्षण देखणेपणा घेऊन उजळली होती. त्या तेजस्वी कणात न्हाऊन निघालेल्या विठ्ठलाच्या सावळ्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य विलसत होतं. काय नव्हतं त्या हास्यात? विलक्षण समाधान, विजयाचा कैफ, लाडक्या भक्ताबद्दलचा ओसंडून वाहणारा अभिमान, त्याचा संकल्प सिद्धीस घेल्याबद्दलचा आनंद आणि चिकाटीनं त्यानं ते काम पूर्ण केलं, त्याबद्दलचं कौतुक! 

લેખક વિશે

 

આ ઇ-પુસ્તકને રેટિંગ આપો

તમે શું વિચારો છો અમને જણાવો.

માહિતી વાંચવી

સ્માર્ટફોન અને ટૅબ્લેટ
Android અને iPad/iPhone માટે Google Play Books ઍપ ઇન્સ્ટૉલ કરો. તે તમારા એકાઉન્ટ સાથે ઑટોમૅટિક રીતે સિંક થાય છે અને તમને જ્યાં પણ હો ત્યાં તમને ઑનલાઇન અથવા ઑફલાઇન વાંચવાની મંજૂરી આપે છે.
લૅપટૉપ અને કમ્પ્યુટર
Google Play પર ખરીદેલ ઑડિઓબુકને તમે તમારા કમ્પ્યુટરના વેબ બ્રાઉઝરનો ઉપયોગ કરીને સાંભળી શકો છો.
eReaders અને અન્ય ડિવાઇસ
Kobo ઇ-રીડર જેવા ઇ-ઇંક ડિવાઇસ પર વાંચવા માટે, તમારે ફાઇલને ડાઉનલોડ કરીને તમારા ડિવાઇસ પર ટ્રાન્સફર કરવાની જરૂર પડશે. સપોર્ટેડ ઇ-રીડર પર ફાઇલો ટ્રાન્સ્ફર કરવા માટે સહાયતા કેન્દ્રની વિગતવાર સૂચનાઓ અનુસરો.