MAHASAMRAT ZANZAVAT

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
5.0
مراجعة واحدة
كتاب إلكتروني
450
صفحة
لم يتم التحقّق من التقييمات والمراجعات.  مزيد من المعلومات

معلومات عن هذا الكتاب الإلكتروني

छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.

التقييمات والتعليقات

5.0
مراجعة واحدة

نبذة عن المؤلف

VISHWAS PATIL IS AN INDIAN AUTHOR AND RETIRED I.A.S OFFICER. HE COMPLETED HIS MASTERS M.A. IN ENGLISH AND A DEGREE IN LAW. HE IS A MULTIFACETED PERSONALITY, KNOWN NOT ONLY FOR THE 1992 SAHITYA ACADEMY AWARD, BUT ALSO AS A SUCCESSFUL PLAYWRIGHT, A FILM DIRECTOR AND AN ABLE ADMINISTRATOR. HE HAS ALSO HELD THE COVETOUS POST OF THE JOINT MANAGING DIRECTOR OF FILM CITY CORPORATION, MUMBAI FOR NEARLY FOUR YEARS. VISHWAS PAIL ACHIEVES MANY PRESTIGIOUS AWARDS LIKE INDIRA GOSWAMI LITERARY NATIONAL AWARD, SAHITYA AKADAMI AWARD AND MANY MORE….


श्री. विश्वास पाटील यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे साहित्यिक योगदान, विशेषत: ‘झाडाझडती’ आणि अलीकडच्या ‘नागकेशर’ या कादंबरीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये पासीघाट (अरुणाचल प्रदेश) येथे झालेल्या तेवीस भारतीय भाषांच्या बहुभाषिक संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांची अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरे होऊन त्या जनप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या ‘पानिपत’, ‘महानायक’ आणि ‘संभाजी’ या कादंबऱ्या इंग्रजीमध्ये वेस्टलँड अ‍ॅमेझॉन कंपनीने तर ‘झाडाझडती’ (A DIRGE FOR THE DAMMED) ही कादंबरी हॅचेट या कंपनीने प्रकाशित केली आहे. त्यांना या आधी केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, प्रियदर्शनी नॅशनल अ‍ॅवॉर्ड, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कोलकात्याचा भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार असे साठहून अधिक साहित्य पुरस्कार गेल्या बत्तीस वर्षांत प्राप्त झाले आहेत. पाटील यांच्या साहित्यगुणांचा गौरव श्री. सुनील गंगोपाध्याय, श्री. अमिताव घोष, इंदिरा गोस्वामी अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहिात्यकांनी जाहीरपणे केला आहे. राज्य शासनाच्या सेवेत असताना आय.ए.एस. अधिकारी या नात्याने त्यांनी शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अनेक वर्षं रखडलेले बांधकाम चौदा महिन्यांच्या अवधीत अग्रक्रमाने पार पाडले. मराठी व इंग्रजी भाषेतील एक उत्तम वक्ते म्हणून श्री. पाटील यांनी लौकिक मिळविला आहे. शिवाय दिल्ली, लखनऊ, कोलकाता, भुवनेश्वर आदी शहरांतील लिटररी फेस्टिवल व इतर साहित्यविषयक समारंभांमध्ये आपल्या साहित्याचे व भाषेचे दर्शन घडविले आहे.

A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt Ltd has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt Ltd to become the leaders in Marathi publishing in India today.

تقييم هذا الكتاب الإلكتروني

أخبرنا ما هو رأيك.

معلومات القراءة

الهواتف الذكية والأجهزة اللوحية
ينبغي تثبيت تطبيق كتب Google Play لنظام التشغيل Android وiPad/iPhone. يعمل هذا التطبيق على إجراء مزامنة تلقائية مع حسابك ويتيح لك القراءة أثناء الاتصال بالإنترنت أو بلا اتصال بالإنترنت أينما كنت.
أجهزة الكمبيوتر المحمول وأجهزة الكمبيوتر
يمكنك الاستماع إلى الكتب المسموعة التي تم شراؤها على Google Play باستخدام متصفح الويب على جهاز الكمبيوتر.
أجهزة القراءة الإلكترونية والأجهزة الأخرى
للقراءة على أجهزة الحبر الإلكتروني، مثل أجهزة القارئ الإلكتروني Kobo، عليك تنزيل ملف ونقله إلى جهازك. يُرجى اتّباع التعليمات المفصّلة في مركز المساعدة لتتمكّن من نقل الملفات إلى أجهزة القارئ الإلكتروني المتوافقة.