‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅन्ड इन्फ्लुअन्स पीपल’आणि ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅन्ड स्टार्ट लिव्हिंग’ ह्या विक्रमी विक्री झालेल्या पुस्तकांमधील निवडक उतारे तुमच्या अंगातल्या सुप्त गुणांना वाव द्या – तुमचा प्रत्येक दिवस रोमांचकारी आणि समाधानाचा बनवा. जरी तुम्हाला तुमचे काम आवडत असले; तरी नक्कीच असे काही दिवस तुमच्या आयुष्यात येत असतील की, ज्या दिवशी कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसेल. अत्यंत लोकप्रिय लेखक डेल कार्नेजी तुम्हाला प्रत्येक दिवस मनपसंत आणि बक्षिसपात्र कसा करायचा आणि प्रत्येक दिवस अधिक मजेदार व आनंदी कसा बनवायचा हे सांगतात. ते म्हणतात – १. इतरांना महत्त्व द्या आणि हे प्रामाणिकपणे करा. २. अनावश्यक ताणतणाव घेऊ नका – तुमची ऊर्जा महत्त्वाच्या कामासाठीच खर्च करा. ३. लोकांना ताबडतोब तुमच्याशी सहमत करून घ्या. ४. रोजच्या कामाचे रूपांतर उत्साहवर्धक संधीमध्ये करा. ५. शत्रू कशामुळे निर्माण होतात, ते ओळखा व ती गोष्ट करण्याचे टाळा. ६. टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहा – तुम्ही तुमचे काम चोखपणे पार पाडले आहे. `हाउ टू एन्जॉय युवर लाइफ अॅन्ड युवर जॉब' हे पुस्तक तुम्हाला आयुष्याकडे आणि लोकांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देईल आणि तुम्हालाही माहिती नसलेल्या तुमच्या अंगातील सुप्त गुणांचे प्रदर्शन घडवेल. डेल कार्नेजी तुमच्या सुप्त गुणांना वाव देण्यास मदत करतील; अगदी कधीही! तुमची बलस्थाने व तुमच्या क्षमता ह्यांचे संगोपन करा – तुमच्या आयुष्याला आजच नवीन अर्थ द्या.