मराठी रंगभूमीला वगनाट्याची ओळख नवी नाही. ‘विच्छा माझी पुरी करा’च्या लोकप्रियतेने ते सिद्धही केले आहे. वगनाट्याचे हे तंत्र अगदीच लवचिक असते... कलावंताच्या प्रतिभेनुसार आणि प्रयोगानुसार त्यात सतत बदल घडत असतात... त्यामुळेच वगनाट्याची गणना ‘स्वैर’ नाट्यात होत असावी.... ...वगनाट्याची ही लोकप्रियता लक्षात घेऊन, द. मा. मिरासदारांनी – ‘मी लाडाची मैना तुमची’ या गाजलेल्या वगनाट्याचे पुस्तकात रूपांतर केले. या वगनाट्याचे वैशिष्ट म्हणजे यासाठी लागणारा गण, गौळण, लावणी आणि मधला वग ही सगळी गीतरचना कै. ग. दि. माडगूळकर यांनी केली आहे...वगनाट्याच्या ऐवजी `प्रहसन’ (फार्स) म्हणूनही ते रंगमंचावर येऊ शकेल. यासाठी केलेला हा पुस्तकरूपी प्रयत्न निश्चितच वाखाण्याजोगा आहे. ‘सोकाजीराव टांगमारे’ या नावाने आजही त्याचे प्रयोग होत आहेत.
काल्पनिक कहानियां और साहित्य