चेहNयावर निरागसता, डोळ्यात खट्याळ हसू
दुडुदुडु धावणारी पावले अन् लपाखराप्रमाणे स्वच्छंदी असू
‘बालपण’ जगातली सगळ्यात सुंदर आठवण. आई-बाबांचे बोट धरून
जगाचा पहिल्यांदा परिचय करून घेताना आलेल्या तरल अनुभवांचे विश्व म्हणजे
बालपण! आवतीभोवतीच्या लाखो गोष्टींबद्दलचे प्रश्न, कुतूहल म्हणजे बालपण.
थोडा हट्ट, खूप लाड म्हणजे बालपण... असे हे रम्य बालपण, जिथे स्वार्थ नसतो,
खोटेपणा नसतो, फसवेगिरी नसते, अभिमान नसतो.
हे बालपण साजरा करण्याचा दिन म्हणजे ‘बालदिन’. स्वतंत्र भारताचे पहिले
पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी भारतात
बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणारे प्रेम व
जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा एक उपक्रम होय. साNया जगभरात २०
नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे आपण म्हणतो. कारण त्या वेळी आपले मन
नुकत्याच उमललेल्या पुâलाप्रमाणे निर्मळ असते. भोवताली पाहण्याचा त्यांचा
दृष्टिकोन हा कुतूहलाचा व निकोप असतो. पूर्वग्रहाने, काळजीने वा आशा-
आकांक्षेने मन ग्रासलेले नसते. ते अधिक संवेदनशील असते. त्यामुळेच
आपल्याला जीवनातील खरा आनंद अनुभवायला मिळतो.
येणाNया काळात भारत जागतिक महासत्ता होणार आहे, असा जयघोष
अधूनमधून ऐवूâ येतो. त्यातच युनोच्या सर्वेक्षणानुसार २०१५ साली भारत हा
‘तरुणांचा देश’ म्हणून गणला जाईल. की ज्या घटकांकडे आजच्या जगाला
विकसित करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले जाते. याची पाळेमुळे
सापडतात ती त्यांच्या बालपणात, बालपणी घडलेल्या संस्कारात...
बालपण, जिथे आयुष्याचा प्रवास सुरू होतो, रेखले जातात मार्ग, घडले
जातात संस्कार, विचारांना मिळते दिशा! त्यामुळे बालआरोग्य, बालशिक्षण आणि
त्यांचा सर्वांगीण विकास हे कदाचित आजच्या उज्ज्वल समाजाचा पाया होय, असं
म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे सर्वच मुलांचे बालपण हे आनंदात,
खेळण्यात, बागडण्यात, शिक्षणात आणि त्याच्या सर्वांगीण विकासाकरिता जायला
हवे; पण परिस्थिती तशी नाही. बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती
करण्याचा हक्क आहे. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या
आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजविली, तर भारताचे भावी
नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित आणि
नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या या
प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल. उद्याचे भविष्य घडविणाNया मुलांच्या
सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या भावविश्वाशी समरस होऊन त्यांच्यावर योग्य
संस्कार करण्याची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व त्यांना योग्य ते शिक्षण
देण्याची जबाबदारी मोठ्यांवर आहे, ही जाणीव बालदिन साजरा करताना
असावयास हवी.
शेवटी,
भागलेला चांदोबा आणि सवंगड्यांचा लपंडाव
खाऊचा भरलेला डबा आणि धुक्यात हरवलेला मामाचा गाव
उफाळून येणाNया या बालपणीच्या आठवणी
नेहमीच घेतात मनाचा ठाव
तुम्हीही तुमच्या बालपणीच्या आठवणी आमच्यासमोर उलगडू शकता.
आपले लेखन ई-मेलने खालील पत्त्यावर पाठवा.
स्स्ुग्ॅसप्ूaज्ल्ंत्ग्ेप्ग्हुप्दल्ो.म्दस्
निवडक लेखांचा अंकात समावेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच
उत्तम लेखासाठी पारितोषिक म्हणून कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर ४० टक्के
सवलत देण्यात येईल.
पत्रोत्तराच्या अपेक्षेत,
मेहता मराठी ग्रंथजगत