ध्यान, योगविद्या हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेला समृद्ध वारसा आहे. ध्यानधारणा ही आध्याqत्मक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी चित्त लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे, असं आपण सर्वसाधारणपणे समजतो. ते खरंही आहे. त्याचबरोबर ध्यानानं अनेक शारीरिक, मानसिक लाभ होतात, यशाqस्वतेच्या वाटचालीत ध्यानाची मदत होते असंही आता लक्षात आलं आहे. वैज्ञानिक कसोट्यांवर हे लाभ सिद्ध होऊ लागले आहेत. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांपैकी काहींची माहिती आणि घरच्या घरी ध्यान कसं करावं हे या पुस्तकात सांगितलं आहे. ध्यान कोणत्याही हेतूनं आणि कोणत्याही पद्धतीनं केलं तरी आपोआपच चित्तशुद्धी होत जाते. शारीरिक, मानसिक लाभापलीकडची आध्यात्मिक उन्नतीही होत जाते. आवश्यक असते ती फक्त चिकाटी!