NIRBACHIT KABITA

· MEHTA PUBLISHING HOUSE
ebook
132
Σελίδες
Οι αξιολογήσεις και οι κριτικές δεν επαληθεύονται  Μάθετε περισσότερα

Σχετικά με το ebook

A young lady who wants to be a poet writes romantic poems based on love or sadness in life.  But Taslima is different.  At the same age, she writes about the inequality and difference in the life of man and woman. She writes about the deceit in the name of love.  She mentions the lust in return of true love.  She throws a light on the disdain in return of self-surrender.  Her poetry is based on these topics.  She does not write to gain name and fame but she writes to protest the women who have been shut up by the society.  She writes with just one aim, to bring equality to men and women. Her poems do not show any bitterness, opposition or hatred.  They have pain, they have dignity, they are hungry for love Much have been written about the deceit that a women faces, the male chauvinism, but Taslima`s bluntness is not seen in any of those poetries or books.  She very truthfully writes about the torture that she was subjected to in a very artistic and perfect language.  

 कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवू इच्छिणारी युवती ज्या वयात गुलाबी प्रेमाच्या किंवा दु:ख व्यक्त करणार्‍या अत्यंत रोमँटिक अशा कविता लिहील, त्या वयात तसलिमा नासरिन स्त्री-पुरुषांच्या जीवनांतील असमानता, प्रेमाच्या  नावावर होणारी प्रतारणा, निखळ प्रेमाच्या बदल्यात मिळणारी भोगलालसा, आत्मसमर्पणाच्या बदल्यात वाट्याला येणारी अवहेलना यांसारख्या विषयांवर कविता लिहिते. ’अतले अन्तरीण’ किंवा ’बालिकार गोल्लाछुट’ ह्यांतील कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते की, तसलिमा केवळ नावलौकिकाच्या लोभाने हातात लेखणी धरत नाही, तर अतिशय सहिष्णू असणार्‍या आणि ज्यांचा आवाजच दाबून टाकला गेला आहे, अशा स्त्रीजातीच्या बाजूने उभी राहून, ती समाजाच्या विरोधात आपला निषेध नोंदविते, आपल्या कवितांमधून. स्त्री-पुरुषांत समानता आणणे हेच तिचे लक्ष्य आहे. या लक्ष्यासाठीच तिला हातात लेखणी धरावी लागली आहे. असे असूनही तिच्या कवितेत फक्त संताप, विरोध किंवा कडवटपणा नाही. उलट, काही कवितांत वेदना आहे, काहींत आत्मसन्मानाची भावना  आहे, तर काहींमध्ये प्रेमासाठी व्याकुळता आहे. जरी ती आपल्या एका कवितेत म्हणते, ’पाहून पुरुषाची पराकोटीची अश्‍लीलता जळते मनातल्या मनात नरकाच्या आगीत पतिव्रता साध्वी स्त्री.’ तरी दुसर्‍या एका कवितेत ती म्हणून जाते, ’एकदा जरी घातली साद एकदा प्रेम केल्यावर सर्व विसरून आसू ढाळते निष्पाप पोर.’स्त्रीच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि पुरुषांचे तिच्यावर असलेले वर्चस्व यांसारख्या विषयांवर याआधी काही कथा, कविता लिहिल्या गेल्या असल्या, तरी तसलिमाप्रमाणे अगदी उघडपणे, स्पष्टपणे कोणीही लिहिलेले नाही. स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण!

 

Αξιολογήστε αυτό το ebook

Πείτε μας τη γνώμη σας.

Πληροφορίες ανάγνωσης

Smartphone και tablet
Εγκαταστήστε την εφαρμογή Βιβλία Google Play για Android και iPad/iPhone. Συγχρονίζεται αυτόματα με τον λογαριασμό σας και σας επιτρέπει να διαβάζετε στο διαδίκτυο ή εκτός σύνδεσης, όπου κι αν βρίσκεστε.
Φορητοί και επιτραπέζιοι υπολογιστές
Μπορείτε να ακούσετε ηχητικά βιβλία τα οποία αγοράσατε στο Google Play, χρησιμοποιώντας το πρόγραμμα περιήγησης στον ιστό του υπολογιστή σας.
eReader και άλλες συσκευές
Για να διαβάσετε περιεχόμενο σε συσκευές e-ink, όπως είναι οι συσκευές Kobo eReader, θα χρειαστεί να κατεβάσετε ένα αρχείο και να το μεταφέρετε στη συσκευή σας. Ακολουθήστε τις αναλυτικές οδηγίες του Κέντρου βοήθειας για να μεταφέρετε αρχεία σε υποστηριζόμενα eReader.