नथुराम विनायक गोडसे या व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या केली आणि भारतीय इतिहासात गांधी आणि गोडसे दोघेही अमर झाले. एक हिंदू माथेफिरू म्हणून गोडसे यांची शासकीय इतिहासात नोंद झाली. पण खरंच गोडसे माथेफिरू की देशभक्त की आणखी काही यावर बरीच चर्चा आजही राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. नायक आणि खलनायक होऊन दंतकथा झालेले हिंदुराष्ट्र या वृत्तपत्राचे संपादक नथुराम गोडसे यांच्यावर एक व्यक्ती म्हणून टाकलेला प्रकाश, त्याचबरोबर गांधीहत्येच्या वेळची परिस्थिती, त्याचा भारतीय व निर्वासित यांच्यावरील परिणाम या सगळ्याचा घेतलेला एक तटस्थ आढावा म्हणजे हे पुस्तक आहे.
प्रत्येक इतिहासप्रेमीच्या संग्रही असावंच असं पुस्तक.