आपल्या समाजानं अगदी काळजीपूर्वक बनवलेला प्रत्येक नियम न् नियम मी मोडला. मी कसलीही बंधनं मानली नाहीत. मला जे जे करावंसं वाटलं, ते ते मी केलं; अगदी सपाटून केल. कोण काय म्हणेल याला मी काडीचीही किंमत दिली नाही. माझं तारुण्य, माझं लैगिक जीवन, माझी बुद्धिमत्ता - सारं काही मी दिमाखान मिरवल. आणि हे सार मी निलाजरेपणे केलाय. मी खूप जणांवर जीव ओतून प्रेम केल, आणि माझ्यावरही काहींनी खूप प्रेम केल......