RAJARSHI SHAHU CHATRAPATINCHE JAHIRNAME VA HUKUMNAME

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
3 ግምገማዎች
ኢ-መጽሐፍ
144
ገጾች
የተሰጡት ደረጃዎች እና ግምገማዎች የተረጋገጡ አይደሉም  የበለጠ ለመረዳት

ስለዚህ ኢ-መጽሐፍ

 This is a compilation of all proclamations and mandating principles as issued by Rajarshee Shahu Chhatrapati. They give us an idea about his caring nature towards his people. He was a great visionary and a social reformer. These proclamations are made available from the Kolhapur Monuments and Archaeological Sites. The editor’s notes are also included therein. Readers and fans of Shahu Maharaj and his work will surely find this extremely helpful.

राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स. १८९४ ते १९२२ या कालखंडाच्या प्रशासनातील हे जाहीरनामे, हुकूमनामे इत्यादींचे उतारे कोल्हापूर पुरालेखागारातील ‘करवीर सरकारच्या गॅझेट’मधून घेतले आहेत. महाराजांच्या नावाने प्रसिद्ध झालेले जाहीरनामे, हुजूर ऑफिसच्या मूळ ठरावानुसार निरनिराळ्या खात्यांच्या प्रमुखांच्या नावाने प्रसिद्ध झालेले जाहीरनामे अथवा हुकूमनामे, प्रजाजनांच्या माहितीसाठीची निवेदने, सार्वभौम ब्रिटिश सरकारकडून प्रसिद्धीसाठी आलेले जाहीरनामे अथवा निवेदने अशा स्वरूपाचे  गॅझेटमधील हे उतारे आहेत. संस्थानच्या निरनिराळ्या खात्यांनी (उदा. जनरल, खासगी, मुलकी, न्याय, शाळा इत्यादी) गॅझेटमध्ये प्रसिद्ध केलेले जाहीरनामे अथवा हुकूमनामे हे हुजूर ऑफिसने म्हणजे खुद्द शाहू महाराजांनी मंजूर करून त्यावर दिलेल्या आदेशांवर आधारित असल्याने, त्या त्या खात्यांचे जाहीरनामे अथवा हुकूमनामे जरी खातेप्रमुखांच्या नावांनी प्रसिद्ध झाले असले, तरी ते महाराजांचेच आहेत, असे संपादकीय टिपणात नमूद केले आहे. संस्थानामधील विविध खात्यांकडून अनेक बाबींसंबंधी (उदा. बदल्या, नेमणुका, नेमून दिलेली कामे इत्यादी) ठराव हुजूर ऑफिसकडे अभिप्रायासह पाठविले जात; तेथे खुद्द शाहू महाराज हे ठराव मंजूर अथवा नामंजूर करीत. नंतर, मंजूर झालेला ठराव आदेशाच्या रूपाने संबंधित खात्याकडे पाठविला जाई आणि मग संबंधित खाते हा आदेश सरकारी गॅझेटमध्ये प्रकाशित करीत असे. अनेकदा खुद्द महाराजच खात्यास आवश्यक तो ठराव हुजूर ऑफिसला सादर करावयास सांगत आणि मग तो आदेशाच्या स्वरूपात गॅझेटमध्ये प्रसिद्ध होई. कोल्हापूर पुरालेखागारात (State Record Office) हुजूर ऑफिसमधील मूळ ठरावांची नोंदबुके वर्षानुक्रमाने उपलब्ध आहेत. या नोंदबुकात Serial No./ रोज नंबर, Date of Receipt /दाखल तारीख, Minor Depart. / पोट खाते, Subject Matter /आले कामातील तात्पर्य, Date of Final Order /निकाल तारीख, Final Order /निकाल हुकूम असे रकाने असून, प्रत्येक ठराव मंजूर/नामंजूर केल्याच्या ‘निकाल’ हुकमाखाली महाराजांची ‘शाहू छत्रपती’ अशी सही आहे.

प्रस्तुत ठिकाणी करवीर सरकारच्या गॅझेटमधील निवडक १३१ उतारे येथे आहेत. त्यांतील बरेच जाहीरनामे व हुकूमनामे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. सर्वसामान्य इतिहासवाचक दप्तरखान्यातील अशा ऐतिहासिक साधनांकडे सहसा वळत नाही. म्हणून त्यास अशा साधनांचा परिचय व्हावा आणि प्रसंगी अभ्यासकांनाही त्यांचा उपयोग व्हावा, या हेतूने तत्कालीन गॅझेटमधील हे निवडक उतारे  संपादकीय टिपणीसह दिले आहेत. प्रत्येक उताऱ्यांच्या खाली गॅझेटचा भाग व प्रसिद्धी तारीख नमूद केली आहे. 

सोबत प्रारंभीच दिलेल्या विषयानुक्रमावर केवळ नजर टाकल्यास शाहू छत्रपतींचे हे जाहीरनामे व हुकूमनामे सामाजिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहेत, हे वाचकांच्या ध्यानी येईल. अगदी आरंभीचे दोन जाहीरनामे वाचले, तरी महाराजांची प्रजाजनांच्या कल्याणाविषयीची तळमळ व पुरोगामी दृष्टी समजून येते. सरकारी अधिकाऱ्यांनी दौऱ्यावर असता रयतेची लुबाडणूक करू नये, म्हणून या राजाने किती बारकाईने लक्ष दिले आहे, हे पाहून मन थक्क होऊन जाते. राज्यावर आल्यावर अल्पकाळातच दुष्काळ व प्लेग यांसारखी अस्मानी संकटे कोल्हापूर संस्थानच्या प्रजेवर कोसळली. त्या संकटांशी मुकाबला करताना महाराजांनी ज्या उपाययोजना केल्या, त्यातूनच पुढे ‘रयतेचा राजा’ म्हणून त्यांची प्रतिमा साकार झाल्याचे दिसून येते. आज दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात ‘जलसाक्षरता अभियान’ मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. पाण्याचे महत्त्व आता आमच्या लक्षात येऊन चुकते आहे; पण शंभर वर्षांपूर्वी १९०२ मध्येच शाहू छत्रपतींनी आपल्या राज्याच्या शेतीविकासासाठी आणि गावोगावच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसिंचन योजनेचा जाहीरनामा काढला होता, तो पाहिल्यावर हा राजा काळाच्या किती पुढे पाहणारा होता, याची कल्पना येते. याशिवाय, सरकारी नोकऱ्यांत मागासलेल्या समाजास ५० टक्के आरक्षण, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने बंदी, अस्पृश्य लोकांना सरकारी नोकऱ्यांत प्राधान्य, वेठबिगार पद्धतीचे निर्मूलन, कुलकर्णी वतनाची बरखास्ती अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर महाराजांनी वेळोवेळी काढलेले जाहीरनामे व हुकूमनामे त्यांच्या चरित्राच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अनमोल ठरले आहेत. प्रस्तुत पुस्तकातील विषय संकीर्ण स्वरूपाचे आहेत. उसाच्या सुधारित घाण्यापासून ‘पाटील स्कूल’पर्यंत आणि सहकारी कायद्यापासून ग्रामपंचायतीच्या स्थापनेपर्यंत अनेक विषय त्यामध्ये येऊन जातात; पण या विषयांतून महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशातील एक ‘समाजक्रांतिकारक राजा’ म्हणून शाहू छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडते. कोणाही शाहू चरित्रकाराला या ऐतिहासिक साधनांचा अभ्यास केल्याविना पुढे जाता येणार नाही.

ደረጃዎች እና ግምገማዎች

5.0
3 ግምገማዎች

ለዚህ ኢ-መጽሐፍ ደረጃ ይስጡ

ምን እንደሚያስቡ ይንገሩን።

የንባብ መረጃ

ዘመናዊ ስልኮች እና ጡባዊዎች
የGoogle Play መጽሐፍት መተግበሪያውንAndroid እና iPad/iPhone ያውርዱ። ከእርስዎ መለያ ጋር በራስሰር ይመሳሰላል እና ባሉበት የትም ቦታ በመስመር ላይ እና ከመስመር ውጭ እንዲያነቡ ያስችልዎታል።
ላፕቶፖች እና ኮምፒውተሮች
የኮምፒውተርዎን ድር አሳሽ ተጠቅመው በGoogle Play ላይ የተገዙ ኦዲዮ መጽሐፍትን ማዳመጥ ይችላሉ።
ኢሪደሮች እና ሌሎች መሳሪያዎች
እንደ Kobo ኢ-አንባቢዎች ባሉ ኢ-ቀለም መሣሪያዎች ላይ ለማንበብ ፋይል አውርደው ወደ መሣሪያዎ ማስተላለፍ ይኖርብዎታል። ፋይሎቹን ወደሚደገፉ ኢ-አንባቢዎች ለማስተላለፍ ዝርዝር የእገዛ ማዕከል መመሪያዎቹን ይከተሉ።