मतकरींच्या प्रगल्भ शैलीतून साकार होत असलेल्या, अगदी अलिकडच्या गूढकथांचा हा संग्रह. वास्तवाच्या पायावर उभे असलेले कल्पनेचे जग, मानसशास्त्रावर आधारलेले भीतीचे विश्व मतकरींच्या कथांमधून साकार झाले आहे. उत्कंठा वाढवणारा संदेश आणि गारठून टाकणारे भय यांच्या जोडीनेच, प्रनिमात्राविषयी करुणा आणि अंतिम न्यायाचा आग्रह, राजकारणाचा स्पर्श हे त्या कथांचे लेखनसूत्र आहे. या आशयसंपन्नतेमुळे मतकरींच्या कथा बदलत्या कालागाणिक अधिकाअधिक अर्थगर्भ होत गेल्या आहेत. गूढकथा हि वाचकाला अचंब्यात टाकण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी लिहिलेली कथा नसून, ती मानवी जीवनावर भाष्य करण्यासाठी निवडलेली एक वेगळी दृष्टी आहे हेच या कथा वाचताना जाणवते.